Past Events


उन्हाळी सुट्टीतील मराठी भाषा वर्ग २०२४


रंगा येई वो

महाराष्ट्र मंडळ हॉंगकॉंगचे अहोभाग्य की बहुआयामी कलाकार श्री सुहास बहुळकर इथे आपल्या नातवंडांना आणि लेकीला भेटायला आले आणि छांदसी बहुळकरच्या पुढाकाराने त्यांचे एक सुंदर व्याख्यान काल आपल्याला ऐकता आले आणि त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी प्राप्त झाली. 

 

वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी केलेले इंदिरांजींचे पोर्ट्रेट, जे.जे. स्कुल ऑफ आर्ट मधील शिक्षण आणि अध्यापन, त्यांच्या चित्रमालिका, चित्रप्रदर्शनं आणि चित्रांमागील प्रेरणा आणि कहाण्या, राष्ट्रपती भवनातील टिळकांचे पोट्रेट आणि त्यातील डोळ्यांमधील तेज आणि तेव्हाचे विद्यमान राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचे गौरवोद्गगार, नानाजी देशमुखांच्या प्रेरणेने दुर्गम भागातील चित्रकूटमधील “रामदर्शन” प्रकल्पाचे विस्मयचकीत करणारे त्यांचे काम, केसरीवाड्यातील diorama, प्रजासत्ताक दिनाला महाराष्ट्र राज्याचे floats चे काम, सावरकर भवनातील काम, विनोबांचे पोर्ट्रेट आणि तेजोवलयाबद्दलचे विचारमंथन (एक सच्चा कलाकारच असा विरूद्धांचा यथोचित पाहुणचार करू शकतो), रिझर्व बँकेच्या अनेक गवर्नरांचे पोर्ट्रेटस आणि कहाण्या, त्यांची प्रकाशित झालेली ११ पुस्तके, दृश्यकला- कोश, त्यांचे काम चौफेर आहे आणि वाणी रसाळ आणि ओघवती, आणि एवढे काम करून पुन्हा विनम्र आणि रोखठोक आहेत. दोन तास कसे गेले ते कऴलेच नाही. 

 

चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्राचे मानकरी हा प्रतिष्ठित पुरस्कार, टिऴक महाराष्ट्र विद्यापीठाची डी.लिट ही पदवी आणि असे अनेक मानसन्मान प्राप्त झालेल्या बहुळकर सरांना स्वतःच्या जाहीरातीची कसलीच आवश्यकता नाही, पण आपल्याला मात्र बहुश्रुत होण्याची फार निकड आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील दृश्यकलेतील वैभवाबद्द्ल आपल्याला असलीच तर फारच जुजबी माहिती असते. हा सनावळ्यातील कंटाळवाणा इतिहास नव्हता, हा एक चालता -बोलता सळसऴता अनुभवकोश होता. आपण इथे काहीसे अनुभववंचित राहतो कारण अशी मोठी माणसं इथे वारंवार येत नाहीत. कार्यक्रमाला गर्दी नव्हती पण जमलेल्या दर्दी मंडळीने संधीचे अक्षरशः सोने केले आणि एक श्रीमंत करून जाणारी संध्याकाळ अनुभवली. कोणाचेच पाय निघत नव्हते तिथून. 

 

बहुळकर सरांचे आणि परिवाराचे मन:पूर्वक आभार. 

 

मुग्धा रत्नपारखी 

अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ हॉंगकॉंग 

१६ मे २०२४

 


महाराष्ट्र दिन २०२४

कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहून ज्यांनी टाळ्या आणि शिट्ट्यांने कलाकारांना प्रोत्साहन दिले, त्यांचे मन:पूर्वक आभार. 

सर्व लहानमोठ्या कलाकारांचे आणि backstage वर झटणा-या प्रत्येकाचे कौतुक.

नृत्य असो वा गायन, वादन, नाटक कुठल्याही सादरीकरणाला प्रत्यक्षातच उपस्थित राहून उत्साहाने दाद द्यायची असते. तो माहौलच वेगळा असतो. ख-या रसिक प्रेक्षकाला कुठल्याही सादरीकरण कलेची आणि त्यामागील कष्टांची जाणीव असते. रसिक प्रेक्षक नृत्य-गायन-वादन-नाटक- कवितावाचन-दृश्यकला यात कसलाही भेदभाव करत नाही. रसिक प्रेक्षक आनंदाने सर्वात सहभागी होतो.

 


कार्यक्रमाचे नाव: गोष्ट दिव्याच्या खांबाची आणि चमचमत्या नाचाची

ऋणनिर्देश

• संहिताः डॉ. मनोज कुळकर्णी

• प्रसिद्धी व पारदर्शिका: प्राजक्ता नायक

• निवेदन: रोहित साबळे आणि छांदसी बहुळकर

• निवेदकांच्या तालमी आणि मार्गदर्शन: सुनील कुलकर्णी आणि केतकी जोशी

• नृत्य दिग्दर्शन: सोनल कुलकर्णी, विनया साबळे, जाई जोशी, शिवांगी कुंभारे,परेश न्याती

• ध्वनिसंयोजन आणि तांत्रिक बाबी: सिद्धार्थ फडके

• नेपथ्य आणि फोटो बुथ : माधवी चावडा

• व्हिडिओ चित्रीकरण : मेघना पाटील, मुदिता वलकटी 

• फोटोः अमित रत्नपारखी, संदिप भाटवडेकर, सचिन प्रधान

• गीतांचे संयोजन: सिद्धार्थ फडके, लीना पै , विनय साबळे 

व्यवस्थापन

• तालमींसाठी जागेचे आरक्षणः लीना पै, अमित वाकडे, विनया साबळे, मुग्धा रत्नपारखी, रोहित साबळे, प्रमिला डिसुझा, छांदसी बहुळकर

• व्यवस्थापन: लीना पै, विनया साबळे, प्राजक्ता नायक, शीतल ओक, मुग्धा रत्नपारखी, अमित वाकडे, मनोज कुळकर्णी

• अल्पोपहार आयोजनः अमित वाकडे

• अल्पोपहार वाटपः मंदार पटवर्धन, शर्मिला कुळकर्णी, गायत्री फडके, अनुराधा पुराणिक

• ⁠कार्यक्रमासाठी सभागृहाचे आरक्षण- अमित वाकडे, लीना पै, छांदसी बहुऴकर

• ⁠मदत आणि धावपळ: गिरी धुमाळ, राहुल पै, मंदार पटवर्धन आणि इतर स्वयंसेवक

 

नृत्य सादरीकरण

• कस्तुरी अजिंक्य

• आरोही डिसुझा

• केतन दत्तानी

• शेफाली गयावाल, यशोदा – रघुवीर – श्रीनिवास गांगल

• ऋजुता गुप्ते

• इरा – अमृता हर्डीकर

• गुरू - ग्रीष्मा अय्यर

• जाई जोशी

• केतकी – आर्या जोशी

• केतकी – ह्रिदा – कश्वी - हर्षद काळे

• संगीता कारेकर

• राजेश्री-ईशा खैरनार

• मनोज कुळकर्णी

• सोनल – जयंत कुलकर्णी

• शिवांगी- जयदीप - अन्वी – अलिशा कुंभारे

• अभिधा – अश्वत्थ – द्वितिल माहिमकर

• वृषाली - निशिता – रितिका नाईक

• सोनी - क्रिस्टिना नुनेस

• परेश न्याती

• शीतल ओक

• अश्विनी – सचिन प्रधान

• प्रिशा सप्रे

• विनया साबळे

• शीतल – सान्वी शिन्दे

मराठी अभिमानगीत गायनः

• समायरा वलकटी



अभिप्राय १ महाराष्ट्र दिन २०२४

 

नमस्कार,

 मी नातवंडांना भेटण्यासाठी हाँगकाँगला पोचलो आणि काल तुम्हा मंडळींच्या, महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाचा अचानक लाभ झाला. कार्यक्रमाची सुरुवात माझा मित्र कौशल इनामदारच्या महाराष्ट्र गीताने झाली...

मस्त वाटले.

मग थोडे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि कौशलला पाठवले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या अध्यक्षांच्या निवेदनापासून सर्वच काही अत्यंत परिश्रमपूर्वक तुम्ही केल्याचे जाणवले. 

पण नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न अशी एक म्हण आहे.... त्याचेच प्रत्यंतर येत 'महाराष्ट्र मंडळाच्या हाँगकाँग मधल्या कार्यक्रमाला अनेक अडचणी' अशी तुम्हा सर्वांची अवस्था झाल्याचे अनुभवत होतो.

त्या सोबतच ही सर्व परिस्थिती तुम्ही किती शांतपणे हाताळली आणि मनावर संयम ठेवत कार्यक्रम ज्या प्रकारे पार पाडला , तो खरोखरच कौतुकास्पद होता, अभिनंदनीय होता.

कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन लिहिले त्यांचे मनःपूर्वक  अभिनंदन! विशेष म्हणजे या निवेदनातून सर्वच पिढ्यांना त्यांच्या काळात जाण्याचा आनंद होईल असेच त्याचे स्वरूप होते. शिवाय तरुण पिढीला पूर्वीचा काळ कसा होता हे त्यातून उलगडत गेले... तर माझ्या पिढीला हल्ली काय सुरू आहे त्याचे ज्ञान झाले.

पण त्या मागे केवळ मराठी माणूस म्हणून एकत्र येण्याचा आनंद होता हे विशेष !

या सर्व मागे तुम्हा सर्व साठ जणांचे किती कष्ट होते ते प्रत्येक क्षणी जाणवत होते.

अगदी दोन वर्षाच्या मुलांपासून ते 60 /65 च्या  मंडळींपर्यंत सर्वजण उत्साहाने वावरत होते... मराठी माणूस एकत्र येऊ शकतो आणि आनंद साजरा करू शकतो सिद्ध करत होते..

हे बघून, अनुभवून गहिवरून आले हो !

महाराष्ट्रात मराठी माणूस खेकड्यासारखा वागतो पण बाहेर गेल्यावर काय करू शकतो याचाच कालचा कार्यक्रम आणि तो अनुभव म्हणजे प्रत्यंतर होते.

 तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन !

 ठरवूनही तुम्ही स्लाइड्स दाखवू शकला नाही... पण ज्या खिलाडूपणे संबंधितांनी ते स्वीकारले ते देखील अत्यंत महत्त्वाचे.

आणि लगेच ज्या प्रकारे त्यातून मार्ग काढला तो तर अनुकरणीयच ! 

 तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन !

 

-सुहास बहुळकर

अभिप्राय २ महाराष्ट्र दिन २०२४

 

मनोगत

मी मुलीकडे हाँगकाँगला प्रथमच येण्याचे ठरत होते. तेंव्हा 11 मे च्या शनिवारी मुंबई ला परत जायचे असा माझा प्लॅन होता. परंतू केवळ मुलगी व जावयाच्या आग्रहा खातर फक्त 1आठवड्याने  मुक्काम वाढविला. तेंव्हा महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाची तारीख कळली नव्हती. परंतू या वाढलेल्या मुक्कामाची सुंदर मनोरंजनात्मक भेट HK च्या महाराष्ट्र मंडळाने दिली. ती म्हणजे ' *गोष्ट दिव्याच्या खांबाची आणि चमचमत्या नाचाची* ' हा कार्यक्रम पहाण्याची संधी. त्यात माझ्या मुलीच्या नृत्याचे सादरीकरण समक्ष पहावयास मिळणे ही दुसरी संधी. म्हणजे जणू काही एकावर एक free gift.

त्या दिवशी हॉल मध्ये शिरल्या बरोबर आजूबाजूची भारतीय माणसे बघून व मराठी संवाद ऐकून क्षणभर मला मुंबईतल्या मराठी कार्यक्रमास आल्या सारखे वाटले. कारण  HK मध्ये प्रथमच इतक्या मराठी माणसांना एकत्र बघत होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीलाच अध्यक्षांनी आलेल्या तांत्रिक व तात्कालिक अडचणी सर्वांपुढे मोकळेपणाने मांडून सहकार्याची साद घातली. पण अडचणीतून कौशल्याने , संयमाने मार्ग काढून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. हीच ती मराठी माणसाची जिगर.यासाठी पडद्यामागील व पुढील सर्वच कलाकारांचे कौतुक!

कार्यक्रमाचे शिर्षक आकर्षक होते. या नावामागे काय काय दडलंय हे बघायची उत्सुकता होती. सुरवाती पासून ते अलीकडच्या काळापर्यंत च्या मराठी गाण्यांवरील नृत्याच्या प्रवासाचे प्रस्तुतिकरण ही संकल्पना मनाला भावली. त्यासाठी एक नायिका व स्टुडीओ तील गेली कित्येक वर्ष नृत्य परंपरेचा साक्षीदार असणाऱ्या दिव्याचा खांब....या दोघांमधील संवाद रूपाने निवेदनआणि लगेच त्याच पार्श्वूमीवरील नृत्ये ही मध्यवर्ती कल्पना आगळी वाटली. लेखकाने दिव्याच्या खांबाला

 बोलते केले आहे. निवेदन व नृत्य सादरीकरण यांचा सुरेख मेळ जमला होता.

लेखन, दिग्दर्शन, निवेदन, नेपथ्य सगळेच भारी.

 सुरवाती चे मराठी अभिमान गीत औचित्यपूर्ण.

बाळ गोपालांचे नाच लडिवाळ वाटले. नृत्याची गती, हावभाव, लवचिकता, ठेके यामध्ये काळानुरूप झालेले बदल सर्वच नृत्य कलाकारांनी अप्रतिम पणे सादर केले. त्यासाठी  निवडलेली गाणी समर्पक होती. यातील काही गाण्यांवर आम्ही शाळा,कॉलेज मध्ये केलेले नाच आठवले. त्याकाळची मजा पुनः एकदा अनुभवली. हे या कार्यक्रमाचेच यश!

बाल नृत्यांपासून आजच्या फ्युजन नृत्या पर्यंत चा आवाका सुबक बांधणी करून सादर केला. याचे श्रेय निश्चितच लेखक, दिग्दर्शक व सर्वच सहभागी यांना.

Slides सह कार्यक्रम झाला असता तर जणू दुग्धशर्करा योगच. त्यामुळे आता slides च्या video ची वाट पहात आहे.

कार्यक्रमा नंतरची माझी मनःस्थिती नृत्य गीतातून सांगायची तर " *बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला* ". 😊

महाराष्ट्र मंडळाचे अभिनंदन!पुढील दमदार वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा!

 

---- स्मिता जोशी.