महाराष्ट्र मंडळाचे नेहमीचे कार्यक्रम (होळी,गणपती, दिवाळी) असतात तसेच अधूनमधून काही उपक्रम कोणीतरी उत्साही, उद्यमशील व्यक्ति हाती घेते. त्यातून आपल्याला तर शिकायला मिळतेच, त्याशिवाय मातृभाषेत भाषेत संवाद साधला जातो, इथल्या वाळवंटात एक ओएसिस निर्माण केले जाते. मराठी भाषेविषयी जिव्हाळा हे ज्यांच्यासाठी आनंदनिधान आहे आणि त्यासाठी उपक्रम राबवणे हा ज्यांचा छंद त्यांच्या पुढाकाराने आपल्याकडे अनेक उपक्रम राबवले गेले, त्या उपक्रमांची ही छोटेखानी ओळख. तसेच काहींने आपल्या येथील वास्तव्याच्या अनुभवांची टिपणं लिहून काढली आहेत. ती वाचण्याजोगी आहेत.