परिशिष्ट २०२३
हा एक फार सुंदर काळ होता असं आता मागे वळून पाहताना वाटते. मुलं आता टीनेजर झालीत आणि विविध देशात राहतात. ती अजूनही एकमेकांच्या, महाराष्ट्र मंडळ हॉंगकॉंगच्या आणि माझ्याही संपर्कात आहेत. त्यांना मराठी व्यवस्थित समजतं आणि ते आजी आजोबांशी, नातेवाईकांशी मराठी बोलू शकतात. लेखनात आणि वाचनात मात्र जास्त प्रगती होऊ शकली नाही.
सोप्या सोप्या गोष्टी- गाण्यांपासून सुरवात करून पुलोत्सवात भाग घेऊ शकेपर्यंत आम्ही पोचलो याचा आनंद आहे.
२०२१ मध्ये मी महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले आणि “बोलतो मराठी “ साठी शिक्षक शोधायला सुरवात केली. आम्ही वर्ग सःशुल्क केले आणि अमृता रानडे आणि प्रीती धोपाटे यांनी उत्तमरित्या ही जबाबदारी पुढे नेली. माझ्या अनुभवांचा फायदा आम्ही पुढील वर्गांची आखणी करण्यासाठी केला.
ह्या आमच्या काही नोंदी.